पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 4) नव्या 133 पॉझिटिव्ह रुग्णांची व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 17) तालुक्यातील 98, पेण व रोहा प्रत्येकी सात, खालापूर, अलिबाग, माणगाव येथे प्रत्येकी चार, श्रीवर्धन तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन, मुरूड व सुधागड तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्णांमध्ये पनवेल मनपा एक व ग्रामीण एक अशा दोघांचा समावेश आहे. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,655 झाला असून, मृतांची संख्या 1611 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55,015 जण कोरोनामुक्त झाले असून, 1029 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …
RamPrahar – The Panvel Daily Paper