Breaking News

पाली नगरपंचायतीच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत निघाली

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली  नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व सदस्य पदांची आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 12) येथील भक्त निवासामध्ये काढण्यात आली. या वेळी नगरपंचायतीच्या 17 प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी  12 ते 16 नोव्हेंबर असून, त्यांची सुनावणी बुधवारी (दि. 17) जिल्हाधिकार्‍यांसमोर होणार आहे. त्याचा अहवाल गुरुवारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडे पाठविला जाणार आहे.  विभागीय आयुक्त सोमवार (दि. 22) पर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील.

प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पाली नगरपंचायत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, तहसीलदार तथा प्रशासक दिलीप रायण्णावार, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

यावेळी भाजप दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गीता पालरेचा व नागरिक उपस्थित होते.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्रमांक 1 व 8 इतर मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 2, 7, 9, 11, 13 व 15 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक 4, 12 व 16 इतर मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 5, 6, 10 व 14 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply