पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 16
पनवेल : प्रतिनिधी
उलवे नोडमधील एका व्यक्तिला कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे.
पनवेल तालुक्यात याआधी कळंबोलीत 11, कामोठे येथे दोन रुग्ण, तर खारघरमध्ये दोन जण कोरोनाबाधित आहेत. अशातच तालुक्यातील उलवे नोडमधील सेक्टर 20 येथील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने त्याला कोरोनाची लागण कशी झाली याबाबत चौकशी केली जात आहे
‘मरकज’मधून परतलेल्यांपैकी 10 जण निगेटिव्ह
उलवे नोडमधील एका रुग्णामुळे आता पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 झाली असून, त्यापैकी कामोठ्याचा एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले आहे. यासोबतच दिल्लीतील निजामुद्दीन येथील ‘मरकज’मधून आलेल्या 14पैकी 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित चार जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.