आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कुंडेवहाळ येथे सिडकोमार्फत मंजुर केलेल्या गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) झाले.
तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या आणि पाठपुराव्याच्या आधारे, जसे आज एक काम सुुरू झाले आहे. अशीच विकासकामे येणार्या कालावधीमध्ये आपल्या परिसरातील मार्गी लागतील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी केले.
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गु्रप ग्रामपंचायतीमध्ये सिडकोमार्फत 90 लाख 61 हजार 309 रुपयांच्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम मंजुर झाले आहे. या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कुंडेवहाळ गु्रप ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशीव वास्कर, उपसरपंच जागृतील वास्कर, सदस्य करिष्मा वास्कर, संगीता वास्कर, सदस्य दत्तात्रेय पाटील, विनोद भोईर, ऋृषीकेश वास्कर, उदय भोईर, शरद भोईर, हासुराम वास्कर, कपील पाटील, तुकाराम वास्कर, आर.आर. वास्कर, नामदेव भोईर, किसन वास्कर, प्रसाद वास्कर, गणेश कडू, राम वास्कर, मिलींद वास्कर, का. गो. पाटील, सुभाष पाटील, महेश भोईर, राखी वास्कर, राणा वास्कर, रामचंद्र वास्कर, गोपाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भूमिपूजनावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोकडे डेव्हपलमेंट एजन्सी म्हणून या परिसराचा विकास करणे त्यांच्या हातात आहे. गावांचा विकास करणे, शाळा, रस्ते करणे ही सिडकोची जबाबदारी आहे. पण दुदैव असे आहे की, सिडको अधिकार्यांची ही जबाबदारी पूर्ण करण्याची मानसिकताच नाही. त्यामुळे सिडकोकडे या संदर्भात आपण पाठपुरावा करूच, पण सिडको जर ही कामे करत नसेल तर सिडकोवर आपण अवलंबून नाही. आपण आपल्या वेगवेगळ्या मार्गाने निधी उपलब्ध करून विकासाची कामे पुर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला.
तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन काम केले तर अशक्य असे काहीच नाही. काम कसे करून घ्यावे व कुठे करून घ्यावे यासाठी प्रयत्नशील राहणे हेच गरजेचे आहे. आपले काम चांगले आहे, त्यामुळे आपल्याला निश्चितच यश मिळेल.
-आमदार महेश बालदी