Breaking News

पेणमध्ये भरदिवसा घरफोडी

पेण : प्रतिनिधी

शहरातील कुंभारआळी येथील बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे बारा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. महिला फिर्यादी (रा. स्पर्श बिल्डींग, दुसरा मजला, कुंभार आळी, पेण) यांच्या बंद फ्लॅटचा लॉक शुक्रवारी (दि. 9) सकाळी 11:30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. व बेडरूममधील बंद लाकडी कपाटाचा दरवाजा तोडून लॅाकरमधील सोन्याचे दागिने, कॉइन व रोख रक्कम असा एकूण 11 लाख 81 हजार रुपये किंमतीचा माल चोरुन नेला. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस सबइन्स्पेक्टर श्री. कदम हे करीत आहेत.

डोलवी येथून बोलेरो गाडीची चोरी

पेण : वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलवी येथे उभी करून ठेवलेली बोलेरो कॅम्पर गाडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी (रा.डोलवी, ता. पेण) यांनी आपली 2 लाख रुपये किमतीची बोलेरो कँम्पर गोल्ड (एमएच-06, बीजी-2254) ही जिप शुक्रवारी (दि. 9) रात्री 8 वाजता डोलवी येथील इंडस्ट्रीयल हार्डवेअर शॉप समोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने  ही गाडी चोरून नेली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार म्हात्रे करीत आहेत.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply