Breaking News

राज्यस्तरीय गणेशमूर्ती स्पर्धेत पेणच्या मृगज कुंभार यांची मूर्ती ठरली सरस

पेण : प्रतिनिधी

येथील श्री गणेश मित्र मंडळ आणि गणपती कारखानदार यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये राज्यस्तरीय गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील मूर्तिकार मृगज कुंभार या मूर्तिकाराने प्रथम क्रमांक पटकावला. तर नितीन पेडणेकर (पेण) याने द्वितीय आणि आकाश लिहे (ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकविला. या दोन दिवसीय राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शनाला पेण नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजा म्हात्रे, भाजपचे विनोद शहा, आरटीओ अधिकारी मंगेश नाईक यांच्यासह राज्यातील विविध स्तरातील नागरिकांनी आणि कारखानदारांनी भेट दिली. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे परीक्षण परीक्षक विशाल शिंदे आणि योगेश निखारे यांनी केले. या स्पर्धेत शैलेश लोके (परेल), केतन चिरनेरकर (अलिबाग), विवेक देशमुख (पेण), सुरज म्हात्रे (रोडे काश्मिरे, पेण), वासुदेव पाटील (भिवंडी), स्वराज वांद्रे (पेण), विश्वजित पाटील (पेण), आशिष कार्लेकर (पेण), मयूर झिंगडे (परेल), राज म्हात्रे (तरणखोप, पेण) या 10 मूर्तिकारांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, अ‍ॅड. मंगेश नेने, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, युवा नेते हितेश पाटील, ललित पाटील, अशोक मोकल, का. रा. पाटील, रामभाऊ गोरीवले आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply