पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब या आस्थापनेत निर्माण झालेल्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना काम देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एका निवेदनाद्वारे आस्थापना अधिकार्यांकडे केली आहे.
एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब आस्थापना स्थानिकांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा आस्थापनेशी चर्चा केली आहे. निवेदनाचा तत्काळ विचार करावा, अन्यथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सनी यादव यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.