Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना निवेदन

पेण : प्रतिनिधी

येथील रेल्वेस्थानकातील विविध मागण्यांसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते वैकुंठ पाटील व पेणकर शाश्वत विकास समितीचे योगेश म्हात्रे यांनी समितीच्या शिष्टमंडळासह मुंबईतील भाजप कार्यालयात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पेण रेल्वे स्थानकातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समितीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे पेण रेल्वेस्थानकातील विविध मागण्यांबाबत लढा सुरू आहे, मात्र या लढ्याला पाहिजे तसे यश मिळत नसल्याने भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्यासह समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत नामदार दानवे यांना मागण्यांचे निवेदन दिले. ना. रावसाहेब दानवे यांनी तातडीने शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.

पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. वाढते व्यापारीकरण, वाढते नागरीकरण लक्षात घेता पेण तालुक्याला भविष्यात फार मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. पेण रेल्वे स्थानकातील समस्यादेखील महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता सर्वपक्षीय नेते, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्याथीर्र्, कामगार यांनी एकत्र येऊन मी पेणकर आम्ही पेणकर विकास समन्वय समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून विविध प्रकारची आंदोलने, उपोषण करून आपल्या विविध मागण्यांची तड लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समितीच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.

विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील पेणकरांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply