Breaking News

उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाणीजोडणी मिळवून देण्याची मागणी

आमदार महेश बालदी यांना निवेदन

उरण : वार्ताहर

उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाण्याचे कनेक्शन मिळण्यासंदर्भात भाजप उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे व कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन आमदार महेश बालदी यांना देण्यात

आले आहे.

पुनाडे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत गोवठणे गावाला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेंतर्गत या परिसरातील असलेल्या पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, पाणदिवे व गोवठणे गावांनादेखील याच पाझर तलावातून पाणीपुरवठा नळाद्वारे केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे या गावात पाणीटंचाई निर्माण होते. या योजनेवर पाण्यासाठी अवलंबून असलेली लोकसंख्या जवळ जवळ 25 हजार आहे. जर हेटवणे योजनेद्वारे पाण्याचे नळ कनेक्शन या गावांना मिळाल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही. हेटवणे धरणाच्या पाण्याचे प्रत्येक गावाला नळ कनेक्शन मिळावे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे आमदार महेश बालदी यांनी या विषयाचा पाठपुरावा सिडकोकडे करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी भाजप उरण तालुका महिला अध्यक्षा राणी सुरज म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड व भाजप कार्यकर्तेउपस्थित होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply