Breaking News

तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात विशेष मतदार नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल येथील आश्रय सोशल फाउंडेशन व लोकपरिषद आयोजित तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्‍या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर गुरुवारी (दि. 25) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

या वेळी रायगड जिल्हा उप निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी मनोगतामध्ये मतदार नोंदणीतून मतदानाचा हक्क तर मिळतोच पण त्यातून आर्थिक, न्यायिक आणि  राजकीय गरजा पूर्ण करू शकत असल्याचे सांगितले.

या शिबिरात उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, सारिका आव्हाड,  लोकपरिषदचे अशोक गायकवाड, उर्मिला यादव, शिल्पा हलणकर, रुकैया  बारगीर, दीक्षिता गावंड, स्वाती कांबळे, अश्विनी लोंढे,  आश्रयच्या मनीषा पवार, जयश्री जाधव, संजीवनी सावंत, मीनल मोहिते, प्रज्ञा कांबळे, सुषमा पवार व नीता जाधव उपस्थित होत्या.

शिबिरात काही ट्रान्सजेंडरनी आम्हाला काही कारणास्तव गुरू बदलावे लागतात. त्यावेळी गुरू निवासी पत्त्याबाबत घोषणापत्र देणार नाही, अशी अडचण सांगितली. तर काहींना आपले पुरुषी  नाव बदलून साटल्यावरचे (साडीवरचे) नाव घेण्यात येणार्‍या शासकीय फी बाबत शंका व्यक्त केली.

दरम्यान, ट्रान्सजेंडरकडे रहिवाशी पुराव्यासाठी भाडे करार पत्र नसते, कारण त्यासाठी द्यावी लागणारी डिपॉजिटची रक्कम त्याचेकडे नसते. तो ज्यावेळी आपल्या आई-वडिलांना सोडून वस्तीवर रहायला येतो. त्यावेळी गुरू केला जातो. साटल्यावर राहताना या गुरूला त्यांना दरमहा ठराविक रक्कम द्यावी लागते. ठरलेली रक्कम न दिल्यास त्यांना गस् हाकलून लावतो मग दुसर्‍या गुरूकडे गेल्यास यांचे बँक किवा इतर शासकीय कागदपत्रे पहिला गुरू देत नाही. कोरोना काळात गुरूला पैसे न दिल्याने अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून याबाबत काही तरी करण्याची मागणी करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply