Breaking News

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत

खोपोली : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाज आरक्षण व विविध योजनांपासून वंचीत राहिला आहे. समस्त ओबीसी समाजाने याचा निषेध करून आगामी निवडणुकांमध्ये या राज्य सरकारला घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांनी या वेळी केले.  भाजप ओबीसी मोर्चाचे खोपोली शहर अध्यक्ष सुनिल नांदे, भाजप खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, उपाध्यक्ष दिलीप पवार, चिटणीस प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, कोषाध्यक्ष राकेश दबके, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. बबन नागरगोजे, निलेश मांगले,  महिला मोर्चा शहराध्यक्षा शोभा काटे, रसिका शेटे, सुनिती महर्षी, गीता मोहिते, अमृता नांगरे, सीमा मोगरे, अश्विनी अत्रे, ओबीसी नेते सचिन मोरे, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख, व्यापारी सेलचे कीर्ति ओसवाल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, पदाधिकारी पुनीत तन्ना, विनायक मंडपे, सिद्धेश पाटील,  संतोष लोहार, सागर काटे, अनिल कर्णूक, प्रमोद वाघ, प्रदीप दळवी, माजी नगरसेवक अनिता शाह इत्यादी  पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या  रथयात्रेद्वारे खोपोली शहराच्या विविध भागात जनजागरण करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply