Breaking News

कल्पेश ठाकूर यांच्या हातून पुण्याचे काम होतच राहो -आमदार रविशेठ पाटील

पेणमध्ये देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन

पेण : प्रतिनिधी

अपघातग्रस्तांना गेली 17 वर्षे विनामुल्य सेवा व कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका पुरविणारे तसेच अन्नदान करणारे कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भविष्यातही कल्पेश ठाकूर यांच्याकडून जनतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत राहो, असे आमदार रविशेठ पाटील म्हणाले.

आजकाल अनेकांकडे पैसा आहेम मात्र तो खर्च करण्याची दानत लागते, ती दानत कल्पेश ठाकूर यांच्याकडे आहे, असे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले. आमदार महेंद्र दळवी यांचेही या वेळी समयोचीत भाषण झाले.

रायगड जिप चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, पेण उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, महावितरण एसईए संघटनेचे सरचिटणीस संजय ठाकूर तसेच दयानंद भगत, तुषार मानकवळे, यशवंत घासे आदींसह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कल्पेश ठाकूर यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply