नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी
आलिबाग : रामप्रहर वृत्त
नुकताच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीला बसला आहे. त्याचप्रमाणे आंबा, भाजीपाला व कडधान्य पिके तसेच विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अलिबाग तालुक्यात नुकताच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने विशेषत: खारेपाट भागात तयार झालेले भात पीक कुजून खराब झाले. वाल, चवळी, हरभरा, आदी कडधान्य पिकांचे तसेच आंबा बागायतदार आणि विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालेल, असा प्रश्न अनेक शेतकर्यांना सतावत आहे.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने मदत केली नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या आपद्ग्रस्त शेतकर्यांना मदत व्हावी, यासाठी शेतकर्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदेश द्यावेत. आणि शासनाने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अलिबाग खारेपाटातील शेतकर्यांतून होत आहे.