पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण प्रदेशच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) 56वे प्रदेश अधिवेशन 3, 4 व 5 डिसेंबर या कालावधीत पर्वरी (गोवा) येथे झाले. अधिवेशनात नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर व प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी पदभार स्वीकारला. कोकण प्रदेशात अभाविपच्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल व सामाजिक विषयांसंदर्भातील आंदोलने याचे संकलन असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या संदर्भात तसेच अधिवेशनता झालेल्या अनेष विषयांसंदर्भात माहिती देण्यात करीता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झाली.
या पत्रकार परिषदेला प्रदेश मंत्री अमित ढोमसे, सहमंत्री निरक कुरकुटे, उत्तर रागिड जिल्हा संयोजक श्रेयस जोगळेकर, पनवेल महनगर मंत्री वैष्णव देशमुख उपस्थित होते.
कोकण प्रदेशात अभाविपच्या वतीने करण्यात आलेले विविध कार्यक्रम, सेवाकार्य, पूरग्रस्त भागातील सेवाकार्य, शैक्षणिक व सामाजिक विषयांसंदर्भातील आंदोलने याचे संकलन असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन 3 डिसेंबर रा.स्व.संघ गोवा विभाग संघचालक राजेंद्र भोबे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशन प्रदर्शनी कक्षाला गोवा राज्यातील थोर साहित्यिक अनंत काकबा प्रियोळकर प्रदर्शनी कक्ष, अधिवेशन परिसरास छत्रपती संभाजी महाराज नगर व मुख्य सभागृहास गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारक टी.बी.कुन्हा सभागृह असे नामकरण करण्यात आले. 4 डिसेंबरच्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. पणजी शहरात भव्य शोभायात्रेचेदेखील आयोजन करण्यात आले. आझाद मैदान, पणजी येथे शोभायात्रा समारोपानंतर जाहीर सभादेखील घेण्यात आली.
कोकण प्रदेशातील शैक्षणिक व सामाजिक सद्यस्थिती संदर्भात एकूण तीन प्रस्ताव या अधिवेशनात सर्वमताने पारित करण्यात आले. कोकण प्रदेशातील विविध शैक्षणिक समस्या, सामाजिक समस्या आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न व सामाजिक सद्यस्थितीचा या प्रस्तावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. वर्ष 2021-22साठी अभाविप कोकण प्रदेश कार्यकारणीची घोषणा समारोप सत्रात करण्यात आली.