रोहे : प्रतिनिधी
एम. बी. मोरे फाऊंडेशन संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात कला शाखा व इतिहास विभागाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी आशा कुंटे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. इतिहास विभागप्रमुख प्रा. माधुरी जाधव यांनी बाबासाहेबांनी केलेले समाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्य, त्यांनी केलेला अभ्यास, यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थिनींनी सुद्धा अभ्यास करावा, असे मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रसन्न म्हसळकर यांनी कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा, असे सांगितले. या वेळी प्रा. दर्शना शिंदे, प्रा. प्रणाली महाडिक, प्रा. हणमंत ढवळे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. दीपेश भोसले यांनी केले.