पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात महापालिकेच्या माध्यामतून राजीव गांधी मैदानात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र’ सुरू होणार आहे. या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) भूमिपूजन झाले, तसेच या वेळी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले देशाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिपीन रावत व सहकार्यांना आदरांजली वाहण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासूनच विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात महापालिकेच्या माध्यामतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सात कोटी 84 लाख रुपयांचे हे काम आहे. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी.देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, समीर ठाकूर, नगरसेविका वृषाली वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, शिवाजी भगत, बुवाशेठ भगत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.