Wednesday , June 7 2023
Breaking News

पोलादपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपीला अटक

पोलादपूर : प्रतिनिधी
येथील एका टपरीचालकाने रविवारी (दि. 6) दुपारी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता वाटल्याने भाजप आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पोलादपूर शहरातील पोस्ट ऑफिसची जुनी इमारत मोडकळीस आली असून सध्या वापरात नाही. येथील मराठी मुलांची शाळा तसेच कन्या शाळेलगत एक टपरी आहे. या टपरीचालकाने रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन (वय 10) मुलीला बळजबरीने जुन्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये नेले आणि तिचा विनयभंग केला. या वेळी मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील लोकांनी त्या मुलीला नराधमाच्या हातून सोडविले.
दरम्यान, हे प्रकरण मिटविले जाण्याच्या शक्यतेमुळे भाजप आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. त्यामुळे महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात येेऊन या तपासकामी मार्गदर्शन केले. सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी याप्रकरणी तपास हाती घेऊन टपरीचालक अनंत यशवंत दरेकर (वय 63, रा. भैरवनाथनगर, पोलादपूर) याच्याविरूध्द लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार भादंवि 354, 354 (ब) (ड) नुसार गुन्हा नोंदविला.  आरोपी अनंत दरेकर याला रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply