पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.
या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सर्व कार्यकारिणी मंडळ सदस्य, सचिव डॉ. एस. टी. गडदे, विद्यालयाच्या प्राचार्या इंदूमती घरत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
Check Also
सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …