Breaking News

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उदघाटन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरणचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले. यासोबत त्यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

या वेळी नवी मुंबई सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पुरोशोत्तम कराड, सीआयएसएफचे कमांडर विष्णू सहाय, नवी मुंबई परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, नवी मुंबई मुख्यालयाचे उपायुक्त अभिजित शिवथरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 पनवेलचे शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे, उरण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोनावणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडीत यांनी केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply