कळंबोली : रामप्रहर वृत्त
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत धान्य वाटप सुरू असताना पिशव्यांचे वाटप कळंबोळी मंडलतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम कार्यक्रमचे संयोजक संतोष मानसिंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या वेळी कळंबोली सरचिटणीस संजय दोडके व सरचिटणीस दिलीप बिष्ट, उपाध्यक्ष संदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास खेडेकर, भिसे व रवी जाधव, महिला प्रभाग अध्यक्ष अंजली पाटकर, महिला मोर्चाचे सरीता, साक्षी गावडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.