Breaking News

विरोधी पक्षनेते दरेकर आज रायगड दौर्यावर

मुंबई : प्रतिनिधी

राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात दरेकर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये एकूण सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान होणार असून मतमोजणी बुधवारी (दि. 22) होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी रायगडचा दौरा करणार आहेत.

या दौर्‍यामध्ये दरेकर हे सकाळी 10 वाजता पोलादपूर शहर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार फेरीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता तळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ बळीचा नाका, तळा येथे आयोजित प्रचारसभेत उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हजर असतील.

नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी कमी अवधी राहिला असल्याने प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले असून दरेकर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply