पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील सेंट्रल स्कूलच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले होते. या नूतन वास्तूचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इमारतीचे काम पाहून चांगली वास्तू उभी राहिल्याने समाधान व्यक्त केले.
या सोहळ्याला उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, कामिनी कोळी, उषा देशमुख, योगीता भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, अभियंता अभिजीत मटकर, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.
या नूतन वास्तूसाठी समग्रह शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून पंचायत समितीला 13 लाख 51 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या इमारतीच्या बांधकामासाठी हा निधी अपुरा पडत होता. या संदर्भात भाऊशेठ पाटील आणि स्थानिक स्कूल कमिटीनेे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना माहिती दिली. याची दखल घेत दाशूनर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चार लाख 25 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …