Breaking News

योगसाधक पु. ल. भारद्वाज यांचे देहावसान

पनवेल : पनवेल आरोग्य सेवा समितीचे (योग केंद्र) संस्थापक संचालक पु. ल. भारद्वाज उर्फ बाबा यांचे मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी आठच्या सुमारास अल्पशा आजाराने देहावसान झाले. ते 96 वर्षांचे होते. योग आणि आयुर्वेदाद्वारे पनवेलकरांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे भारद्वाज यांचे निधन झाल्यानेे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील योग विद्या निकेतनमध्ये प्रशिक्षण घेऊन निवृत्तीनंतरही आराम न करता भारद्वाज यांनी सन 1989मध्ये पनवेल येथे योगकेंद्राची मुहूर्तमेढ रोवली. योग आणि आरोग्याला वाहिलेले योगसखा मासिक या योगकेंद्रातर्फे गेली 18 वर्षे त्यांनी सातत्याने प्रकाशित केले. भारद्वाज यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply