Breaking News

ब्रायन लारा, डेल स्टेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून प्रशिक्षकपदी नियुक्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज डेल स्टेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने लाराला फलंदाजी प्रशिक्षक आणि स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. टॉम मूडी हे हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 400 धावा करणारा एकमेव फलंदाज लाराला फ्रेंचायझीने धोरणात्मक सल्लागार बनवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काऊट अशी दुहेरी भूमिका निभावणार आहे. मुथय्या मुरलीधरनसारखा दिग्गज या फ्रेचायझीशी आधीच संबंधित आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच मुरलीधरन संघासाठी रणनीतीही आखतो.

ब्रायन लाराने वेस्ट इंडिजकडून 133 कसोटी आणि 299 वनडे सामने खेळले. त्याने कसोटीत 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके आहेत. त्याने 1994मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 आणि 2004मध्ये 400 धावा केल्या होत्या. याशिवाय लाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 19 शतकांच्या मदतीने 10 हजार 405 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 53 शतके आणि 22 हजार 358 धावा आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply