Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलादपुरात सुशासन सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर : प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. या वेळी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून  नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली होती. जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, संजय गांधी योजनेसंबंधी कामे, नवीन मतदार नोंदणी झालेले ओळखपत्र वाटप, नवीन शिधापत्रिका व दुय्यम शिधापत्रिका, तसेच शिधापत्रिका नाव वाढवणे आणि कमी करणे, नवीन आधार नोंदणी तसेच दुरुस्ती, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस, आरोग्य तपासणी आणि फेरफार अदालत आदी योजनांचा लाभ नागरिकांना या शिबिरात देण्यात आला. त्यासाठी महसूल विभागाचे अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, मंडलाधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल, तसेच आरोग्य विभाग आणि सेतू केंद्राचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. तहसीलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसीलदार शरद आडमुठे, नायब तहसीलदार समीर देसाई यांनी या सुशासन सप्ताहात सहभाग घेतला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply