Breaking News

रोटरी क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने बालाजी सिम्फानी या इमारतीच्या आवारात रविवारी (दि. 21) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात ‘एक चमच कम, चार कदम आगे’ म्हणजे साखर, मीठ व तेल यांचा आपल्या रोजच्या आहारातील एक चमचा कमी करून रोजच्या चालण्यात चार पावले अधिक वाढवा, असे सांगण्यात आले. हे केल्याने आरोग्य सुदृढ व निरोगी राहील, असे डॉ. गिरीश गुणे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद करून शिबिर आयोजनाचे महत्त्व सांगितले.

या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, संधिवात, ईसीजी, बॉडी मास इंडेक्स या प्रकारे मोफत तपासणी करून सर्व रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. शिबिर आयोजनात रोटरी क्लबच्या आरोग्य संचालिका सायली सातवळेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व रोटरी सदस्यांसह हे शिबिर यशस्वी केले.

या वेळी डॉ. गिरीश गुणे यांच्यासह क्लब अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, डॉ. संजीवनी गुणे, डॉ. सी. डी. कुलकर्णी, डॉ. संतोष जाधव, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. लक्ष्मण आवटे, डॉ. राजेश गांधी, डॉ. जया गुरसाळे, डॉ. मिलिंद घरत, डॉ. रोहिणी घरत आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व रुग्णांची तपासणी केली. रोटरी क्लबच्या पदाधिकारी, सदस्यांचे, तसेच बालाजी सिम्फानी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य या वेळी मिळाले. या शिबिराचा 196 रुग्णांनी लाभ घेतला.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply