Breaking News

कर्जत पालिकेचे स्वीपर मशीन ठरतेय निरुपयोगी

कर्जत : बातमीदार

शहरातील सिमेंटक्राँक्रिटच्या रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी कर्जत नगर परिषदेने 2019मध्ये तब्बल 47 लाख 37 हजार खर्च करून स्वीपर मशीनची खरेदी केली होती. मात्र तंत्रज्ञ आणि तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने स्वीपर मशीन नगर परिषद कार्यालयाबाहेर बंद आवस्थेत पडून आहे. कर्जत शहरातील बहुतेक मुख्य रस्ते आरसीसी सिमेंटचे झाले आहेत. हेे रस्ते धूळविरहित असावेत यासाठी नगर परिषदेने स्वीपर मशीन खरेदी केले, पण ते चालविण्यासाठी डिझेल आणि प्रशिक्षित वाहनचालकावर किती खर्च येईल, याचा ठोकताळा न घेतल्याने आजच्या घडीला हे मशीननगर परिषदेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. स्वीपर मशीन चालविण्यासाठी तसा चालक कर्जत नगर परिषदेकडे सध्या उपलब्ध नाही. आठवड्यातील फक्त तीन दिवस शहरात स्वीपर मशीन फिरवायची म्हटली, तरी तब्बल 18 हजारांचे डिझेल लागते. कर्जत नगर परिषदेच्या काही प्रभागातील रस्ते अरुंद आहेत. तेथे हे स्वीपर मशीन घुसतसुद्धा नाही. स्वीपर मशीनचा रस्ते साफसफाईसाठी अपेक्षित असा उपयोग होत नाही. त्यामुळे या मशीनसाठी खर्च केलेला निधी वाया गेला असल्याची टीका येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमोध कुलकर्णी यांनी केली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply