Breaking News

थर्टी फर्स्ट अन् नववर्ष स्वागतासाठी नियमावली जारी

मुंबई : कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने आधीच निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आता थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी असेल. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने धार्मिक स्थळी गर्दी करू नये, असेही स्पष्ट करून मिरवणुका व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply