मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग
खारघर : रामप्रहर वृत्त
शिवसेना भाजप आणि रिपाइं मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिवसेना, भाजप आणि रिपाइं मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांचा सर्वत्र प्रचार सुरु आहे. त्याअनुषंगाने खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ अध्यक्ष अभिमन्यू पाटील, महिला व बालकल्याण सभापती लिना गरड, नगरसेवक प्रविण पाटील, शत्रुघ्न काकडे, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, संजना कदम, अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, किर्ती नवघरे, वासुदेव पाटील, गीता चौधरी, बिना गोगरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.