Breaking News

शार्दूल ठाकूरचा डबल धमाका!

आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप

दुबई ः वृत्तसंस्था
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटीमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याने  फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी झेप घेतली आहे.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शार्दूल ठाकूरने 138व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट 79व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ओव्हलच्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये शार्दूल ठाकूरने अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली होती. गोलंदाजीमध्येही शार्दूल ठाकूरने 56 वरून 49व्या स्थानी झेप घेतली आहे. ओव्हल कसोटीत शार्दूलने पहिल्या डावात एक व दुसर्‍या डावात दोन बळी घेतले होते. दोन्ही डावांमध्ये मिळून शार्दूलने 23 षटकांमध्ये फक्त 76 धावा दिल्या होत्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply