Breaking News

होमिओपॅथिक गोळ्यांचे आज घरपोच वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे पनवेल शहर मंडल सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने आज मंगळवारी (दि. 2) प्रभाग 18 मधील नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात. यावर्षी कोरोना जागतिक महामारी आहे, त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सोशन डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून आरोग्यदायी कार्यक्रम होत आहेत. त्या अनुषंगाने प्रभाग 18 मधील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या औषधाचे घरपोच वितरण केले जाणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply