उरण : वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्याचे व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक ह्यांनी रायगड दिसास्टर रेस्क्यू फोर्स तयार करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान
आयोजित केले.
पनवेल तालुक्यातील प्रशिक्षण बी. पी. मरीन इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आले. प्रशिक्षक म्हणून उरणच्या नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक के. आर. कुरकुटे ह्यांनी आपत्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांची सखोल माहिती दिली. तसेच प्रशिक्षनार्थींकडून सराव ही करून घेतला. या प्रशिक्षणाचा उद्देश आपत्तीच्या वेळेस सरकारी पथक पोहोचण्याआधी जखमींना किंवा आपत्तग्रस्तांना तातडीने मदत मिळावी व कमीत कमी जीवित हानी व्हावी हा उद्देश होता. या प्रशिक्षणाचा सांगता समारंभ प्रा. डॉ. आमोद ठक्कर ह्यांच्या भाषणाने झाला. समारोप समारंभास नागरी संरक्षक दलचे उप मुख्य क्षेत्ररक्षक नवीन राजपाल, निसर्ग मित्र मंडळाचे कुमार ठाकूर, डॉ. आशीष ठाकूर, के. आर. कुरकुटे, अनिकेत पाटील, रायगडभूषण हरेश्वर ठाकूर आदी उपस्थित होते.