पनवेल : वार्ताहर
मुंबई, ऑल इंडिया हॅन्डीकॅप्ड युनायटेड फ्रंट राष्ट्रीय अध्यक्ष विकास शर्मा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिव्यांगांसाठी आणलेल्या योजना व केलेल्या कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर झाले. त्या निमित्ताने मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. या बैठकीला राज्य सल्लागार मंडळ सदस्य विजय मालंडकर हे उपस्थित होते.