Breaking News

कळंबोलीत होणार निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती

नवी मुंबई : बातमीदार

राज्य शासनातर्फे युवकांना कुशलता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असते. तरुणांना अधिक लाभ व्हावा यासाठी नवी मुंबईत निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई हे सर्वाधिक उद्योग व्यवसाय व सर्व्हिस कंपन्या असलेले शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथेच हे केंद्र उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाचा राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे, आयटीआयचे आधुनिकीकरण, 75 हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात सहा प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होणार आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply