Breaking News

स्थगिती सरकार!

रायगडातील 114 विकासकामांना ‘स्टे’

अलिबाग : प्रतिनिधी

ग्रामविकास विभागाने 25-15 शिर्षकाखालील मंजूर केलेल्या, परंतु 5 डिसेंबरपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील 114 कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. 

25-15 शिर्षकाखालील 5 डिसेंबरपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा कामांना स्थगिती देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमातंर्गत मंजूर झालेली कामे आणि यात्रास्थळ विकास कार्यक्रमातंर्गत समाविष्ट असलेल्या दोन ते 25 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी ग्रामविकास विभागाकडून 25-15 शिर्षकाखालील निधी दिला जातो. यातील बहुतांश कामे ही स्थानिक लोकप्रतिनिधी सूचवित असतात. त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर कामे मंजूर होत असतात, मात्र अथक प्रयत्नांनंतर मंजूर झालेली कामे स्थगित झाल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे.

ही कामे थांबली!

सन 2019-20 या वर्षात ग्रामीण विकासासाठी 25-15 शिर्षकाखाली रायगड जिल्ह्यातील 114 कामांना मंजुरी देण्यात आली होती. यात बांधकाम विभागातील 108, पाणीपुरवठा विभागातील दोन, तर शिक्षण विभागातील चार कामांचा समावेश होता. यासाठी आठ कोटी 65 लाख 93 हजार रुपयांचा निधी लागणार होता. यातील 29 कामांना कार्यारंभ आदेशासाठी प्रस्तावित होते, मात्र राज्य सरकारच्या 4 डिसेंबरच्या आदेशानुसार ही सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत. या आदेशानुसार या वर्षी मंजूर झालेली सर्वच्या सर्व 114 कामे स्थगित झाली आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply