Breaking News

पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रदक्षिणा मार्ग होणार सील

पंढरपूर ः प्रतिनिधी

आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे 29 जून ते 2 जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किमी परिसरात

संचारबंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र आता प्रदक्षिणा मार्गावरच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रविवारी (दि. 28) प्राप्त झाला आहे. त्यामुळे संचारबंदीचा निर्णय येण्यापूर्वीच इतर नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्ग सील करण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी इतर जिल्ह्यातून आलेले व कोरोनाची लक्षणे आढळलेले स्थानिक नागरिक असे 47 जणांचे आरोग्य विभागाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.

– प्रदक्षिणा मार्गावर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रदक्षिणा मार्ग कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येणार आहे. या परिसरात इतर नागरिकांनी जाऊ नये. त्या परिसरातील नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. -वैशाली वाघमारे, तहसीलदार, पंढरपूर

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply