Breaking News

मंदिरांबाहेर भाजपचे घंटानाद आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार

मंदिर बंद उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार  असे म्हणत नवी मुंबईत अनेक मंदिरांच्या बाहेर भाजपातर्फे घंटानाद करण्यात आला. सेक्टर 12 कोपरखैरणे येथे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक यांनी दत्त मंदिरासमोर घंटानाद केला. तसेच मविआविरोधात घोषणा दिल्या. यासोबत सिवूड्स सेक्टर 46 येथे शनी मंदिरासमोर घंटानाद करण्यात आला.

या वेळी जिल्ह्याध्यक्ष रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात बार उघडण्यास परवानगी दिली पण मंदिरात दर्शनासाठी अजूनही दरवाजे बंदच आहेत, अशा अजब राज्य कारभार चालवणार्‍या बिघाडी सरकारचा निषेध केला. या वेळी भजन कीर्तन म्हणत लाक्षणिक उपोषण करून आंदोलन करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply