Breaking News

खासदार श्रीरंग बारणेंना विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा

पिंपरी : प्रतिनिधी

शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आकुर्डीतील दोन मौलवींनीदेखील खासदार बारणे यांना पाठिंबा दिला आहे.

कुंभार समाजोन्नती मंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे. भाजपच्या कारकिर्दीत देशाने अतुलनीय प्रगती केली असून, गोरगरीब व पददलित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचे महत्त्वाचे कार्य या सरकारने

केले आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या वतीने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जीएसटीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, ऑनलाइन ई-सुविधा, परवानग्यांमध्ये  सुलभता व भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन केले आहे. सरकारच्या दूरदृष्टी धोरणामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार्‍याला भविष्यात चांगले दिवस येणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स पिंपरी-चिंचवडने पाठिंबा पत्रात म्हटले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply