Breaking News

महायुतीला साथ द्या!

आ. प्रशांत ठाकूर यांचे मतदारांना आवाहन

खारघरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान सुसंवाद

खारघर : रामप्रहर वृत्त

देशहित आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 27) येथे केले. ते मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी संवाद साधत होते.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर शनिवारी सकाळीच खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये पोहचले. या वेळी त्यांनी मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध कल्याणकारी योजना जनहितार्थ राबविल्या आहेत. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगून महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांना मत देऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन केले.

या वेळी नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत करून त्यांना प्रतिसाद दिला. या वेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सोबत होते.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply