परीक्षा होणार ऑनलाइन
मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 5) केली. त्याचप्रमाणे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील त्यांनी जाहीर केला.
महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात बैठक झाल्यानंतर बुधवारी मंत्री उदय सामंत यांनी निर्णय जाहीर केला.
सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.