Breaking News

महाडमधील विन्हेरे शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

15 विद्यार्थी, दोन शिक्षक बाधित

महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचण्यांचे अहवाल समोर आले असून यामध्ये 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांना झालेला हा संसर्ग असिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजेच कोणालाही कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply