Breaking News

रायगडात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 2021मध्ये 2254 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2031 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले. 2020 पेक्षा 2021मध्ये 273 गुन्हे जास्त घडले आहेत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. 2020मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 79 टक्के होते. यंदा हे प्रमाण 82 टक्के आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलीस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. रायगड पोलीस दलाच्या वार्षिक कामगिरीची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दुधे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या वेळी उपस्थित होते. 2021 मध्ये 38 खुनाचे गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी 37 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. एक दरोडा टाकण्यात आला होता तो उघडकीस आला. 23 जबरी चोरीचे गुन्ह दाखल झाले होते. त्यापैकी 13 उघडकीस आले. 161 घरफोड्या झाल्या. त्यातील 78 उघडकीस आले. 408 चोरीच्या प्रकरणांपैकी 224 उघडकीस आणण्यात यश आले. 2021 मध्ये सत्र न्यायालयात 108 खटल्यांचे निकाल लागले. त्यापैकी 26 आरोपींना शिक्षा झाली. महिला अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 141 उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली. मोटार वाहनांवर कारवाई करून चार कोटी 30 लाख 30 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. 272 बेवारस मोटार वाहनांचा लिलाव करून 34 लाख 10 हजार रुपये जमा करण्यात आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आला, अशी माहिती दुधे यांनी दिली.

गुन्हे उघडकीसाठी सीसीटीव्हींची मदत

गेल्या वर्षभरात रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सध्या 12 हजार 93 कॅमेरे चालू आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे 42 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. येत्या वर्षभरात हा आकडा 25 हजारावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाड तालुक्यात येणार्‍या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून तेथे संपर्क यंत्रणा सशक्त केली जाणार आहे. 1 जूनपासूनच महाड शहरात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येईल. तो 24 तास सुरू राहील, असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply