Breaking News

पनवेल महानगरपालिकेतर्फे पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये पत्रकार दिनानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील पत्रकारांची भूमिका व सहभाग या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले आहे. पनवेल महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांचा आणि लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्याचा उपक्रम आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत गुरुवारी (दि. 6) पत्रकार दिनानिमित्ताने दुपारी 12 वाजता ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांमधील जडणघडणीतील पत्रकारितेची भूमिका या विषयावर चर्चा होणार असून साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी, लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव सहभागी होणार आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पत्रकार, वृत्त निवेदक व संपादक, तसेच नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी हीींिीं://षेीाी.सश्रश/नलउऋीर्वीकइॠष3ढइु7 लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply