मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार राज्ूय सरकारसमोर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही सरकारचा कोणता विचार नाही, अशी माहिती दिली, तसेच तूर्तास लॉकडाउन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरूच्चार केला. या वेळी त्यांना लॉकाडउन, नाईट कर्फ्यू लावणार का? असं विचारण्यात आलं असता म्हणाले की, या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …