तिघांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पेंढारमाळ हद्दीत अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
पेंढारमाळ परिसरातील जंगल भागात अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करण्यात येत असल्याची खबर मिळाल्यानंतर पाली पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्या वेळी कमा वाक, पांडू चौधरी, उमी घुटे (रा. पेंढारमाळ, पोस्ट घोटावडे) हे संगनमत करून बेकायदेशीररीत्या गावठी दारू तयार करण्याचे साहित्य, भांडी, साधने, उपकरणे जवळ बाळगून त्याद्वारे दारू गाळण्याची भट्टी चालवीत असल्याचे निदर्शनास आले. त्या भट्टीतून गाळलेली दारू ते ड्रममधून विक्री करीत असत. पाली पोलिसांनी धाड टाकून ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली.
या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एन. डी. महाडिक अधिक तपास करीत आहेत.