Breaking News

कर्जतच्या शारदा मंदिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

कर्जत : प्रतिनिधी

येथील शारदा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सादर केला.

कर्जत शहरातील शाळा मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोना महामारीमुळ ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आणि मुलांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणार्‍या शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे नुकताच स्नेहसंमेलन झाले. त्यात विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे उद्घाटन डॉ. दिपाली मोघे आणि डॉ. अंजली गांगल यांच्या हस्ते करण्यात आले.

शारदा मंदिरच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात देशातील क्रांतिकारक, साधु-संत, देवदेवता, गडकिल्ले, वन्यजीव तसेच भारतभुमीतील रणरागिणी यांच्या इतिहासाची आठवण करून देणारी सुरेख भित्तीचित्रे काढून भारतमातेचा इतिहास पुनर्जीवित केला होता.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply