Breaking News

अभिनेता कमाल खान म्हणतो, धोनीकडेच नेतृत्व द्या!

चेन्नई : वृत्तसंस्था

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएला 12 वा मोसम बंगळुरूसाठी फार निराशाजनक राहिला. बंगळुरूने पहिल्या सहा मॅच गमावल्यानंतर सातव्या मॅचमध्ये विजय मिळवता आला. बंगळुरूच्या कामगिरीवरून टीमवर आणि पर्यायाने कॅप्टन विराट कोहलीवर देखील सोशल मीडियावरून टीका केली जात आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. आपल्या उलटसुलट ट्विटमुळे चर्चेत असणार्‍या कमाल खानने ट्विट करत विराटवर टीका केली आहे. विराट कोहलीची मॅचदरम्यान केली जाणारी वर्तणूक ही बरोबर नसून तो अनेकदा मैदानात उर्मटपणे वागतो. बंगळुरू टीमचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीची टीम अंकतालिकेत शेवटच्या स्थानी आहे, तर दुसर्‍या बाजूला भारतीय टीमचा माजी कॅप्टन असलेला महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईची टीम अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. धोनी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी कर्णधारपद कोहलीकडून काढून धोनीला द्यावे, अशी मागणी कमाल खान याने केली आहे. कमाल खानने अशा प्रकारे टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील कमाल खानने कोहलीला लक्ष करत टीका केली होती. कमाल खान सातत्याने आपल्या ट्विटद्वारे विराट कोहलीवर टीकेचे बाण सोडत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply