पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वडखळ येथील नऊ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व त्या परिसरातील 75 घरांमधील 450 ग्रामस्थांना 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. या लोकांना शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत कुठेही जाण्यास अटी व शर्तीनुसार प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी हे आदेश पारित केलेले आहेत.
वडखळ गावातील कोरोनाबाधित मुलाच्या घराशेजारून ते वावे आळी येथील देवजी गणा म्हात्रे ते मारुती म्हात्रे यांच्या घरापर्यंत तेथून देवेंद्र म्हात्रे ते विठ्ठल जाखा म्हात्रे यांच्या घरापर्यंत पुढे गणपत तुकाराम म्हात्रे ते चंद्रकांत रामा म्हात्रे ते देवजी गणा म्हात्रे यांच्या घरापर्यंत या परीघातील 450 घरांचा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहाणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा होईपर्यंत पुढील 28 दिवसापर्यंत लागू राहतील. पेणमधील ज्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टरने या मुलावर उपचार केले होते त्या डॉक्टरलासुद्धा होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …