Breaking News

गव्हाण विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

उरण ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मैदानावर बसून डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित, तसेच इतर अवांतर पुस्तकांचे वाचन केले. वाचलेल्या पुस्तकातील धड्यांचे चिंतन मनन करून प्रातिनिधिक स्वरूपात पूजा बगाटे, भाविका कोळी व वैशाली वानखेडे या विद्यार्थिनींनी माहिती सांगितली. शर्मिला पाटील हिचे समयोचित भाषण झाले. प्राचार्या साधनाताई डोईफोडे यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगून वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना 10 फायदे सांगितले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ग्रंथालयातून पुस्तके प्रदान करण्यात आली. याच दिवशी जागतिक हात धुणे दिन असल्याने द्रौपदी वर्तक यांनी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने शास्त्रशुद्ध हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply