नवी मुंबई ः प्रतिनिधी
बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे यांच्या वतीने नेरूळमधील रामलीला मैदानात आयोजित शंकरदादा मोहिते चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत आरसीसी कुंभवडे संघाने विजेतपद पटकाविले. वॉरियर्स बिळासी संघ उपविजेता ठरला. यास समाधान मानावे लागले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबईसह महाराष्ट्रातील 32 नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन शिराळा पंचायत समिती सभापती सम्राट नाईक, प्रकाश पाटील, विवेकसिंग नाईक, प्रमोद साळुंखे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूर पन्हाळकर, फलंदाज महेश डफळे, गोलंदाज नरेश कुंभवडे, क्षेत्ररक्षक सुहास चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यांनाही बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे नेरूळमधील पदाधिकारी व सदस्यांनी केले होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …